जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२२ । जळगाव केंद्रावर जी.डी.सी.ॲड ए व सी.एच.एम. परीक्षा २७ व २९ मे 2022 रोजी होणार आहे. त्यासाठी परीक्षार्थीकडून ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

ऑनलाईन अर्ज व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे या परीक्षेसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत १० ते २० मार्च, २०२२ या कालावधीत असून ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत सविस्तर सूचना सहकार खात्याच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या Website व उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तसेच ऑनलाईन अर्ज https:gdca,Maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरता येतील. जे परीक्षार्थी या परीक्षा देवू इच्छितात, अशा परीक्षार्थीनी परीक्षेसंदर्भात आवश्यक ती माहिती सहकार खात्याच्या संकेतस्थळावरून प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहन संतोष बिडवई, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

- डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
- जळगाव जिल्ह्याची पाण्याची चिंता संपणार? गिरणा धरण शंभरीच्या उंबरठ्यावर!
- पुणे यार्डातील तांत्रिक कामामुळे भुसावळ, जळगावमार्गे धावणाऱ्या ‘या’ रेल्वे गाड्यांच्या सेवेत मोठा बदल
- पावसाचा हायअलर्ट ! जळगावसह अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा
- जळगाव जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत पावसाचा ‘येलो अलर्ट’; हवामान खात्याचा इशारा









