जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२२ । अमळनेर येथील जीएम सोनार नगर येथील भाविकांचे श्रद्धास्थान संत गजानन महाराज यांचा 23 फेब्रुवारी रोजी प्रकट दिन असल्याने मंदिराचा प्रवेशद्वाराचे व विविध कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

23 फेब्रुवारी सकाळी ७ ते ९ पाद्यपूजन केले जाणार आहे. महिलांची सामूहिक पारायण होणार आहे. दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकट दिनानिमित्त अमळनेर शहरातील कर्तृत्व नेतृत्व दातृत्व यांचा त्रिवेणी संगम असलेले अविनाश जी. सोनार यांच्या माध्यमातून जी .एम सोनार नगर येथे श्री गजानन महाराज मंदिरात महाप्रसाद व मंदिराच प्रवेश द्वाराचा उदघाटन सोहळा आयोजित केला आहे. हा सोहळा प्रवेशद्वार बनून देणारे दाते व मंदिराच्या विकासकामासाठी कायम सिहांचा वाटा घेणारे दाते अविनाश गणपतराव सोनार यांच्या हस्ते होणार आहे. याची सगळ्या गजानन परिवाराने नोंद घेऊन कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असे संत गजानन महाराज सेवा संस्थानचे अध्यक्ष प्रा. आर .बी .पवार यांनी कळविले आहे.

- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






