⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | नोकरी संधी | RBI मध्ये पदवी पाससाठी नोकरीचा गोल्डन चान्स ! 950 पदांवर बंपर भरती, वेतन 40000 मिळेल

RBI मध्ये पदवी पाससाठी नोकरीचा गोल्डन चान्स ! 950 पदांवर बंपर भरती, वेतन 40000 मिळेल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

RBI Recruitment 2022 : पदवी उत्तीर्णांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये 950 पदांसाठी बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना rbi.org.in या संकेतस्थळावर थेट अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च २०२२ आहे.

पदाचे नाव : असिस्टंट

शैक्षणिक पात्रता:

उमेदवाराजवळ कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी हवी. ही पदवी परीक्षा त्याने 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

असिस्टंटपदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 फेब्रुवारी 2022 रोजी 20 ते 28 वर्ष असायला हवे. शासकीय नियमांनुसार, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना यातून सवलत देण्यात आली आहे. अन्य मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्ष आणि अनुसूचिच जात-जमातीच्या उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची सवलत देण्यात आली आहे.

परीक्षा शुल्क:

खुल्या प्रवर्गातील आणि अन्य मागास प्रवर्गातील उमेदवारांना 450 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. तर, मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना 50 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. परीक्षा शुल्क डेबिट कार्ड/क्रेडीट कार्ड/ नेट बँकिंगच्या माध्यमातून करता येईल.

निवड प्रक्रिया:

उमेदवारांची निवड ही पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि एलपीटी परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील परीक्षा 26-27 मार्च 2022 दरम्यान ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

पगार आणि भत्ते
RBI सहाय्यक पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना ₹ 20700 चे मूळ वेतन दिले जाईल. याशिवाय ₹ 265 अतिरिक्त पगार, 2200 श्रेणी भत्ता, 12587 महागाई भत्ता, 1000 वाहतूक भत्ता, 2238 घरभाडे भत्ता, 2040 विशेष भत्ता आणि 1793 स्थानिक नुकसान भरपाई भत्ता दिला जाईल. एकंदरीत, उमेदवाराला सुमारे 40,000 रुपये निव्वळ वेतन दिले जाईल.

महत्त्वाच्या तारखा:

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 17 फेब्रुवारी 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 मार्च 2022
परीक्षेची तारीख : 26 आणि 27 मार्च 2022

अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.