जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२२ । जळगाव शहरातील योगेश्वर नगरमधील महिलेचा हिटरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. सुषमा प्रकाश महाजन (वय ५७, रा.योगेश्वर नगर) असे मयत महिलेचे नाव आहे. तिला उपचारार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले.

याबाबत असे की, शहरातील योगेश्वर नगरमधील सुषमा महाजन या घरामध्ये सकाळी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली होती. त्या वेळेला तिला हिटरचा शॉक लागून ती फेकली गेली. त्यावेळी कुटुंबियांनी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्राची सुरतवाला यांनी मयत घोषित केले.

शनिपेठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान, पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
हे देखील वाचा :
- गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणेशोत्सव स्पर्धांतून संस्कृतीचा जागर
- सराफा बाजारात शनिवारी मोठी तेजी! सोने-चांदीत तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ?
- जळगाव रेल्वे स्थानकावरील कामाचा फटका; १२ गाड्या रद्द, अनेकांच्या वेळेत बदल
- मुंबईत लालबागच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या तरुण अभियंत्याचा मृत्यू
- बांभोरी पुलावरून महिलेने घेतली गिरणा नदीत उडी; शोधमोहीम सुरू !










