जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल नगर परिषद हद्दीत नविन वस्तीमध्ये होत असलेल्या कामे निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार प्रांतांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची चौकशी करून कार्यवाही करणेबाबत फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी मुख्याधिकारी यांना पत्र दिले आहे.

येथील राजेश कडू महाजन यांनी फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्याकडे २४ जानेवारी रोजी तक्रार केली होती. त्यात म्हटले होते की, नगर पालिका हद्दीतील पाईप लाईन व रस्त्यांचे क्रांकिटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्याची गुणवत्ता तपासणी करावी व त्याचा अहवाल घेतल्या शिवाय अंतिम बील प्रदान करुन नये, किंवा ठेकेदारास बील अदा करताना जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडून रितसर परवानगी घ्यावी, असे त्यांनी म्हटले होते. याबाबत नुकतेच फैजपूर भाग उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांना पत्र देत. या तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यामुळे मुख्याधिकारी काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागून आहे.

- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






