जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन । नशिराबाद येथील नागरिकांना रेशनकार्ड संबंधित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने गेल्या जुलै २०२१ पासून प्रयत्न सुरू होते. गावातील सुमारे १५०० कुटुंबांना नवीन व दुय्यम रेशनकार्ड बनवून देण्यात राष्ट्रवादी पार्टीला यश आले आहे. तसेच ९५०५ लोकांना १२ अंकी ऑनलाईन प्रणालीत समाविष्ट करून ४७२५० किलो धान्य मंजूर करण्यात आले. कुटुंबांचे नावे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने वाढविण्यात व कमी करण्यात पार्टीच्या कार्यकर्त्यांना यश आले.

वर्षानुवर्षांपासून वरील समस्या लोकांना भेडसावत होत्या. समस्या सोडविताना वैयक्तिक नागरिक अनेक अडचणींना तोंड देत होते. त्यावर फार मोठ्या प्रमाणात नागरिकांची आर्थिक फसवणूक होत होती. पैसे घेऊनही काम होत नव्हती या सर्व बाबी लक्षात घेऊन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नशिराबाद शहराच्या वतीने तहसीलदार जळगाव यांना निवेदन देऊन समस्या सोडविण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांती दिना पर्यंतची मुदत देण्यात आली. नऊ ऑगस्ट क्रांतिदिनी नशिराबाद ते जळगाव तहसील कार्यालयापर्यंत पायी चालत जात दांडी मार्च आंदोलन करण्यात आले. नागरिकांची ही कागदपत्रे जमा करून शासकीय शुल्क स्वीकारत जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. सर्व प्रयत्न फळास लागून समस्या नागरिकांच्या आयुष्यात अमुलाग्र व सकारात्मक बदल घडविणारे हे कार्य तातडीने केले. फेब्रुवारी महिन्यापासून नशिराबाद नागरिकांना याचा प्रत्यक्षात फायदा होणार आहे.

रेशन कार्ड व 12 अंकी क्रमांक वाटप कार्यक्रमास महाराष्ट्राचे लोकनेते एकनाथ खडसे, जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 18 फेब्रुवारी रोजी ७:०० वाजता होळी मैदान खालची आळी येथे संपन्न होणार आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






