अमळनेरात ५ हजार जणांची ई-श्रमकार्ड नोंदणी, कार्डांचे वितरण सुरू

फेब्रुवारी 17, 2022 9:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२२ । अमळनेर तालुक्यात भाजपाचे दिवंगत नेते उदय वाघ यांच्या जयंतीनिमित्त २२ डिसेंबरपासून असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी, मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी अभियान सुरू झाले आहे. या अभियानात सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक जणांची नोंदणी तालुक्यात झाली आहे. नोंदणीनंतर शहरासह गावोगावी या कार्डांचे मोफत वितरण देखील माजी आमदार स्मिता वाघ यांच्याहस्ते सुरू झाले आहे.

e card jpg webp

या अभियानानंतर्गत ग्रामीण भागात गावोगावी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. भाजयुमो प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नोंदणी अभियान, स्व.उदय वाघ यांच्या स्मारकस्थळापासून सुरू झाले होते. ई-श्रम ही केंद्र शासनाची योजना असून या माध्यमातून सीएससी ई-श्रम वर ३८ कोटी संघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी केली जाणार आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस देखील यातून तयार केला जाणार आहे. या योजनेचा लाभ अमळनेर तालुक्यातील कामगार बांधवाना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. अमळनेर तालुक्यात ई-श्रम कार्ड नोंदणीत महिलांचाही मोठा सहभाग आहे.

आवाहन
नोंदणी करणाऱ्या असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेऊन, त्यांच्या क्षमतेप्रमाणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. एवढेच नव्हे हे कार्ड तयार केल्यास सरकार असंघटित कामगारांना एक वर्षासाठी विमा मोफत देणार आहे. तसेच सरकारला असंघटित कामगारांसाठी धोरण व कार्यक्रम राबविण्यात मदत होणार आहे, अशी माहिती भैरवी वाघ पलांडे यांनी दिली. तसेच कुणीही नोंदणीपासून वंचित राहू नये, असे आवाहन केले.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now