⁠ 
रविवार, सप्टेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | पत्रा वाकवून मेडिकल फोडले, सात लाखांचा ऐवज लंपास

पत्रा वाकवून मेडिकल फोडले, सात लाखांचा ऐवज लंपास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२२ । चाळीसगाव येथील बस स्थानकासमाेरील गणेश रोडवरील द्वारका मेडिकलच्या छताची लोखंडी पत्रे उचकावून, दोघा भामट्यांनी दुकानातून ७ लाखांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना १६ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. मात्र, चोरटे मेडीकलच्या सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

राजरत्न सुधाकर पाटील यांचे बसस्थानकासमाेर द्वारका मेडिकल शॉप आहे. मंगळवारी रात्री ते नेहमीप्रमाणे मेडीकल बंद करून घरी गेले. त्यानंतर बुधवारी पहाटे मेडीकलच्या छताची पत्रे उचकावून दोन चोरट्यांनी दुकानात प्रवेश करत ६ लाखांची रोकड व ८० हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत, असा सुमारे ६ लाख ८० हजार रूपयांचा ऐवज लांबवला. सकाळी दुकान उघडल्यानंतर पाटील यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सागर ढिकले करत आहेत.

कापूस विक्रीचे पैसे
दोघे चोरटे दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हे चोरटे दुकानामागीलभिंतीने छतावर उतरले, तसेच पत्रे उचकावून दुकानात शिरले. चोरीस गेलेल्या ऐवजापैकी ६ लाख रूपये हे कापूस विक्रीतून आले होते. दोन दिवसांपासून दुकानातील कपाटात ही राेकड ठेवलेली होती. तसेच साेन्याची पाेतही नातेवाईकांची हाेती, अशी माहिती पो‍लिसांनी दिली. श्वान पथक घटनास्थळी घुटमळले. त्यामुळे चोरांचा माग काढता आला नाही.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह