⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | गुन्हे | अरे बापरे ! नवरा-बायकोसह दोन मुलांनी संपविले जीवन, कारण अस्पष्ट..

अरे बापरे ! नवरा-बायकोसह दोन मुलांनी संपविले जीवन, कारण अस्पष्ट..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२४ । धुळे शहरातील समर्थ कॉलनी परिसरात एकाच कुटुंबांतील चौघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आई वडील, आणि दोन मुलांनी आत्महत्या केली असून या भयंकर घटनेने जिल्हा हादरुन गेला आहे. दरम्यान या दोघांच्या आत्महत्यामागील कारण अद्याप समोर आलं नाहीय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत तपास सुरु केला आहे.

धुळे शहरातील समर्थ कॉलनीमध्ये प्रवीण मानसिंग गिरासे, गीता प्रवीण गिरासे व मुलं मितेश प्रवीण गिरासे, सोहम प्रवीण गिरासे वास्तव्यास होते. या चौघांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यापैकी प्रविण गिरासे यांनी गळफास घेऊन तर कुटुंबातील इतर तिघे जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. आई वडिलांनी दोन सोन्यासारख्या लेकरांसोबत आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या सामुहिक आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आले नसून संपूर्ण कुटुंबाने इतक्या टोकाचा निर्णय का घेतला असावा? असा सवाल आता उपस्थित होत आहे

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.