जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । राज्यसेवा पूर्वपरीक्षा शहरातील ३२ उपकेंद्रांवर २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत होणार आहे. परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात फक्त परीक्षार्थींना प्रवेश राहील, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.

तसेच पेपर सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंतच्या कालावधीसाठी शहरातील ३२ उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरात कोणीही प्रवेश करू नये, हे आदेश परीक्षेच्या दिवशी सकाळी ८ वाजेपासून ते पेपर रवाना होईपर्यंत प्रत्येक उपकेंद्रावर ३ पुरुष व २ महिला पोलिस कर्मचारी बंदोबस्त तैनात करावा. परीक्षा केंद्राजवळच्या १०० मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनिक्षेपक हे पेपर सुरू असलेल्या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत, असेही आदेश दिले आहेत.

हे देखील वाचा :
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






