जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । १६ विविध गंभीर गुन्हे दाखल असलेला व पोलिस उपनिरीक्षकांना मारहाण करणारा गुंड निखिल राजपूत याला बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी सकाळी श्रीराम नगरातून अटक केली. अटकेनंतर त्याने पोलिस वाहनात बसण्यास नकार दिल्याने त्याला पायी चालतच बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणले गेले.
शहरातील श्रीराम नगरातील हनुमान मंदिराजवळ २७ नोव्हेंबर २०२१ रोजी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश भास्कर घायतड हे गस्तीवर होते. यावेळी राजपूतने त्यांना मारहाण करत माझ्या जवळील पिस्टलने तुला मारून टाकेल, अशी धमकी दिली होती. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. पैकी पाच आरोपींना अटक झाली होती. तर निखिल राजपूतसह तीन आरोपी पसार होते. सोमवारी (दि.१४) निखिल घरी आल्याची माहिती मिळताच बाजारपेठचे निरीक्षक राहूल गायकवाड यांनी पथकासह छापा टाकला. गच्ची वरुन पळून जाण्याचा प्रयत्नातील निखिलला अटक केली. यावेळी त्याने पोलिसांना दमदाटी केली. निखिलला पकडताना बाजारपेठचे कर्मचारी प्रशांत सोनार हे जखमी झाले.
सादर घटनेत, अटकेवेळी पळून जाण्याचा प्रयत्न करत निखिलने पोलिसांना धक्काबुक्की केली, त्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. तसेच त्याच्या कुटुंबियांनीही प्रतिकार केल्याने शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुंड राजपूतला पायी पोलिस ठाण्याकडे आणताना रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, ताब्यात घेतल्यानंतर नीखिलने पोलिसांच्या शासकीय वाहनात बसण्यास नकार दिला. यामुळे पोलिसांनी त्याला श्रीराम नगर, जामनेर रोड या मार्गाने पायीच बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणले. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात एपीआय हरीष भोये, महिला कर्मचारी चौधरी, सीमा चौधरी, आशा बाविस्कर, वनिता बाविस्कर, साबळे, राजेश पाटील, गणेश चौधरी, यासिन पिंजारी, दिनेश कापडणे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार यांनी ही कारवाई केली.
या कारवाईनंतर सायंकाळी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. निखिल राजपूत तसेच अन्य टोळी, गुंडांकडून कुणाची फसवणूक, खंडणी उकळणे, प्रॉपर्टी बळकावणे असे प्रकार झाले असतील तर पोलिसांत तक्रार द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
हे देखील वाचा:
- ना. गुलाबराव पाटीलांनी सप्तशृंगी मातेच्या दर्शनानंतर स्वीकारला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रिपदाचा पदभार
- बापरे पोटातून निघाला बारा किलोंचा गोळा; डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
- महायुती सरकारने घेतला शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत ‘हा’ मोठा निर्णय
- महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय; वाचा काय आहेत?
- जळगाव तालुक्यात अवैध दारूभट्ट्या उद्ध्वस्त; सव्वा पाच लाखाचा मुद्देमाल जप्त