जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । धरणगाव शहरालगत असलेल्या वनीकरणमध्ये केबल वायर जाळून तांबे व इतर धातू काढण्याच्या प्रयत्न करीत असलेल्या दोन भामट्यास वन विभागाने ताब्यात घेतले आहे.
मागील काही दिवसापासून धरणगावातील वनीकरणात आग लागण्याच्या घटना घडत होत्या. त्या अनुषंगाने वन अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. रविवारी अचानक धरणगाव वनीकरण गट क्रमांक १२४८ मध्ये अस्लम शेख व मुशर्रफ अली निसार हे दोघे तरुण केबल वायर जाळण्याच्या प्रयत्न करत होते. परंतु, तत्पूर्वीच वन अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. वनपाल अनिल साळुंखे व वनरक्षक एन. एन. क्षीरसागर यांनी ही कारवाई केली. तर दोघांना ताब्यात घेतले आहे, असे वनपाल अनिल साळुंके यांनी सांगितले.
हे देखील वाचा :
- तलाठी हल्ला प्रकरणातील आरोपींना 24 तासांच्या आत अटक; जिल्हाधिकारींनी दिले कडक कारवाईचे आदेश
- जळगाव शहरात अपघाताची मालिका सुरूच: भीषण अपघातात महिलेचा मृत्यू
- अॅड. प्रवीण चव्हाणांना ‘या’ अटी शर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर
- भरधाव कार झाडाला धडकली; रावेरचे तिघे तरुण जागीच ठार
- जळगावत अपघाताची मालिका सुरूच; फुपनगरी फाट्याजवळ भीषण अपघातात दोघे मित्र ठार