जळगाव महानगरच्या अध्यक्षपदी अनिता वाणी

फेब्रुवारी 17, 2022 9:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । महाराष्ट्र प्रदेश सहकार भारतीच्या पदाधिका-यांची बैठक रविवारी जळगाव जनता सहबॅंकेत प्रदेश अध्यक्ष शशिताई अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सहकार भारतीची जळगाव महानगरची कार्यकारिणी प्रदेश सह संघटन मंत्री शरद जाधव यांनी घोषीत केली.

anita wani 1

जळगाव महानगरच्या अध्यक्षपदी अनिता वाणी यांची नियुक्ती करण्यात आली. तर कुमुद नारखेडे – सचिव, सुनिता कोत्तावार – संघटन प्रमुख, मीनाक्षी जोशी कार्यकारिणी सदस्य, सुमेधा करमरकर, रेवती कुरणभट्टी, मनीषा खडके, सविता नाईक, शांता वाणी, सुरेखा पाटील, माधुरी जहागिरदार, प्रतिभा सुर्वे, सावित्री साळुंके, सुनिता जोहरे, रवि करंजे, नितीन नेमाडे, प्रशांत टेंभुर्णे, नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचे शशीताईंनी गुलाबपुष्प देवून स्वागत केले.

यावेळी राष्ट्रीय संघटन मंत्री संजयजी पाचपोळ यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस राष्ट्रीय संपर्क प्रमुख दिलीप पाटील, प्रदेश संघटन मंत्री संजय परमणे, राष्ट्रीय महिला प्रमुख रेवतीताई शेंदुर्णकर तसेच महाराष्ट्रातील ९ विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now