⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | कासोद्यात ६० हजार रुपये लांबविले, चोरटा अटकेत

कासोद्यात ६० हजार रुपये लांबविले, चोरटा अटकेत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२२ । रात्रीच्या वेळी शेतात गव्हाला पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या घरातून, चोरट्याने ६० हजाराची रोकड व ५ हजार किंमतीचा मोबाईल असा एकूण ६५ हजारांचा ऐवज लांबवला. १० रोजी रात्री ही चोरी झाली होती. घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी चोरट्याला अटक केली.

कासोद्यातील बिर्ला चौक परिसरात गुरुवारी रात्री चोरट्याने, शेतकरी दामू कुंभार यांच्या घरात चोरी केली. शेतकरी कुंभार हे शेतात गेले होते. तर त्यांची पत्नी व मुलगी खालच्या खोलीत झोपले होते. घराच्या वरील मजल्यावरून चोरट्याने आत प्रवेश करून कपाशी विक्रीतून आलेले ६० हजार रुपये व मोबाईल लांबवला होता. रोकड कुलूप लावलेल्या पत्री कोठीत होती. त्या कोठीचे कुलूप तोडून चोरट्याने रक्कम लांबवली. तसेच बिर्ला चौकातील योगिता कृषी केंद्र या दुकानातूनही ७०० रुपये चोरीस गेल्याची तक्रार राजेंद्र येवले यांनी नोंदवली.

बिर्ला चौकातील एका सीसीटीव्हीत चोरटा कैद झाला होता. त्यामुळे वर्णनावरून पोलिसांनी शेख साहिल शेख युसुफ (वय १९, रा.सैय्यद वाडा, कासोदा) याला अटक केली. पुढील तपास सहदेव घुले, जितेश पाटील, इम्रान खान, स्वप्नील परदेशी करत आहेत.

हे देखील वाचा:

author avatar
टीम जळगाव लाईव्ह