रेल्वेच्या धडकेत अनोळखी महिला ठार

फेब्रुवारी 17, 2022 10:53 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२२ । शहरातील खंडेराव नगर ते आशाबाबा नगर बोगदा दरम्यान रविवारी सकाळी ६.३० च्या सुमारास रेल्वेच्या धडकेत एका अनोळखी महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली असून महिलेने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे

crime

रविवारी सकाळी आशाबाबा नगर रेल्वे बोगदा ते खंडेराव नगर रेल्वे बोगदा दरम्यान रेल्वे रुळावर दादर अमृतसर एक्सप्रेसचा धक्का लागल्याने एका ३५ ते ४० वर्षीय अनोळखी महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या अंगात निळ्या रंगाचा टॉप त्यावर पांढऱ्या रंगाची बारीक डिझाईन असलेला आणि पांढऱ्या रंगाची लेगीज पँट आहे.

याप्रकरणी रेल्वे स्टेशन मास्तर यांनी कळविल्याने रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत महिलेबाबत काही माहिती मिळून आल्यास रामानंद नगर पो.स्टे.ला 0257-2282864 यावर किंवा तपासी अंमलदार अजित पाटील यांना मोबाईल क्रमांक 8208336689 यावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now