धानोराजवळ अपघात : महिला जागीच ठार, चालक फरार

फेब्रुवारी 17, 2022 10:53 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । येथून जवळच असलेल्या धानोरा गावाजवळ एका पादचारी महिलेला भरधाव चारचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, अपघातानंतर लागलीच चालकाने पळ काढला. नागरिकांनी चारचाकी किनोद येथे अडवली.

accident near dhanora woman killed on the spot

जळगाव तालुक्यातील किनोद परिसरात अनेक मोलमजुरी करणारे कुटुंबीय राहतात. गुरुवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास काही महिला पायी जात होत्या. धानोरा गावाजवळ भरधाव चारचाकी क्रमांक एमएच.१९.एएक्स.६०५५ ने दिलेल्या धडकेत मुन्नीबाई बारेला (वय-४०) हिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर चालकाने लागलीच पळ काढला असताना काही नागरिकांनी चारचाकी किनोद गावाजवळ अडवली.

दरम्यान, अपघातानंतर आदिवासी बांधवांनी भरपाईची मागणी केली. जवळपास तास दीड तास मृतदेह जागीच पडून होता. घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ पोहचल्यावर देखील सुमारे दीड तास जमाव जमलेला होता.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now