फूस लावून अल्पवयीन मुलीला पळविले, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

फेब्रुवारी 17, 2022 10:04 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । जळगाव तालुक्‍यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. हा प्रकार मंगळवारी उघडकीस आला असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime (1)

तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मंगळवार ८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ ते बुधवार ९ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता या दरम्यान मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. अल्पवयीन मुलीच्या पालकांनी तिचा नातेवाईकांसह मैत्रिणींकडे शोधाशोध केली. परंतु ती कुठेही आढळून आली नाही.

याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता अल्पवयीन मुलीचे वडील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now