जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे येथील अजय इंगळे या २५ वर्षीय तरुणाने ८ रोजी दुपारी खामखेडा पुलावरून पुर्णा नदीपात्रात उडी घेत आत्महत्त्या केली होती. याबाबत मयताचे भाऊ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गावातील एका २८ वर्षीय तरुणीने लग्नासाठी तगादा लावला होता. तसेच मानसिक छळप्रकरणी आत्महत्तेस कारणीभूत संशयित तरुणी संगीता इंगळे हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तरुणाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीसांनी बुधवारी न्यायालयात संशयित आरोपी संगीता इंगळे हिला हजर केले असता १४ दिवसची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

हे देखील वाचा :
- जळगावातील निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वाची सूचना; तात्काळ KYC पूर्ण करा, अन्यथा..
- पारोळ्यातील बाधित भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटलांसह जलसंपदा मंत्र्यांनी केली पाहणी
- अनुसूचित जाती व नवबौद्ध बचतगटांसाठी खुशखबर; मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार ९० टक्के अनुदान
- जळगावात एफडीएची धडक कारवाई ! ५ हॉटेलचे परवाने निलंबित, ३८ लाखांचा गुटखा जप्त
- भुसावळमार्गे धावणार मुंबई–दानापूर एकेरी विशेष ट्रेन










