शेतातील झाडाला गळफास घेऊन 23 वर्षीय युवकाची आत्महत्या

फेब्रुवारी 17, 2022 10:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२२ । सध्या आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अशात आता एरंडोल तालुक्यातील वैजनाथ येथील २३ वर्षीय युवकाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली. नितीन शालीग्राम पाटील (वय २३, रा. वैजनाथ ता. एरंडोल) असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याने आत्महत्या का केली? याबाबत अद्यापही कळू शकले नाहीय. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

23 year old commits suicide

काय आहे नेमकी घटना?
धरणगाव तालुक्यातील वैजनाथ येथील नितीन शालीग्राम पाटील हा तरुण कुटुंबियांसोबत वासव्यास असून त्याचा मोठा भाऊ पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीला असून नितीन हा घरी वडीलांना शेतीकामात मदत करीत होता.

शेतात रात्रीची लाईट असल्याने नितीन हा रात्री शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता. आज सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारास नितीनचे काका भगवान पाटील हे त्यांच्या शेतात गेल्याने त्यांना नितीनने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती आपल्या भावाला दिली.

दरम्यान त्यांनी घटनास्थळी धाव घेत नितीनचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. त्याची तपासणी केली असता, त्याला मयत घोषीत केले. मयत नितीनच्या पश्चात त्याच्या पश्‍चात आई, वडील, मोठा भाऊ, विवाहित बहिण असा परिवार आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now