⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | चोपडा | धानोऱ्यात रस्त्यावरील फेव्हरब्लॉक खचले

धानोऱ्यात रस्त्यावरील फेव्हरब्लॉक खचले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२२ । धानोऱ्यात मुख्य रत्यांवर तसेस गावातील बहुतांशी गल्ली बोळांमध्ये आमदार निधी, जि.प.निधी, पं.स.निधी, ग्रामपंचायत यामधून ज्या त्या लोकप्रतिनिधींनी आपापल्या परीने विकासकामे करत फेव्हरब्लॉक बसवली आहेत. परंतु आता हे फेव्हरब्लॉक जमिनीत खचत असून याच्या देखभाल दुरुस्तीकडे ग्रामपंचायत प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतप्रती ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

आमदार, जि.प., पं.स. सदस्य, यांनी आपल्या निधीतून धानोरा येथे मुख्य रस्त्यावर तसेच गावातील अनेक ठिकाणी फेव्हरब्लॉक बसविले आहेत. परंतु आता जमीनीत उंदीर व घुसांमुळे बीळ तयार झाल्यामुळे यावरून एखादे अवजड वाहन गेल्यास हे फेव्हरब्लॉक खाली खचून रस्ता खालीवर होत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन खचलेल्या फेव्हरब्लॉकच्या जागी सिमेंट काँक्रीटचा भराव करून रस्ता पूर्ववत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गावात ठिकठिकाणी फेव्हरब्लॉक बसविण्यात आले असून अनेक ठिकाणी हे फेव्हरब्लॉक उखडायला लागले आहेत. तसेच गावात काही ठिकाणी बांथकाम सुरू असून याठिकाणी येणाऱ्या अवजड वाहनांमुळे देखील हे ब्लॉक्स जमिनीत खचत आहेत. तर नवीन नळ कनेक्शन साठी खोदकाम केल्यानंतर फेव्हरब्लॉक तुटलेल्या अवस्थेत तसेच सोडून दिले जात आहेत. यामुळे रस्त्यावर चालतांना आबालवृद्धांचा फेव्हरब्लॉक वर पडलेल्या खड्ड्यात पाय जाऊन दुखापत होत आहे.

लोकप्रतिनिधी आपल्या निधीतून फेव्हरब्लॉक बसविण्याचे काम केले असले तरी याची पुढील देखभाल दुरुस्तीची कामे करणार कोण? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला असून ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन फेव्हरब्लॉक दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह