जळगाव जिल्हाधरणगाव

भारतीय नाैदलात निवड झालेल्या युवकाचा पालकमंत्र्यांनी केला सत्कार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२२ । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील नरेंद्र वसंतराव फुलपगार या युवकाची भारतीय नौदलात निवड झाली आहे. प्रशिक्षण पूर्ण करून गावी आल्यानंतर त्याची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.

सत्कार समारंभाचे आयोजन अखिल भारतीय जीवा सेना पाळधी शहर शाखेतर्फे करण्यात आले. व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे, जीवा सेना जिल्हाध्यक्ष देविदास फुलपगार, महाराष्ट्र नाभिक महामंडळ संपर्क प्रमुख किशोर सूर्यवंशी, मोहनराव साळवी, माजी सरपंच अलिम देशमुख, उपसरपंच चंदन कळमकर, किरण नांद्रे यांची उपस्थिती होती. भगवान मराठे, प्रकाश श्रीखंडे, गोविंद फुलपगार, आत्माराम फुलपगार, अशोक सोनार, श्याम फुलपगार, वसंत फुलपगार, नितीन फुलपगार, गणेश फुलपगार, जितेंद्र फुलपगार यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन जीवा सेना तालुका उपाध्यक्ष गोपाल सोनवणे यांनी केले.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button