ॲड.पाटील यांना पीएचडी रिसर्च फेलोशिप

फेब्रुवारी 6, 2022 3:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२२ । यावल तालुक्यातील मनवेल येथील रहिवासी व सध्या जळगाव येथे वास्तव्यास असणारे ॲड.ललित हुकूमचंद पाटील यांना डेटा त्रेल्स या कंपनीकडून नुकतीच रिसर्च फेलोशिप देण्यात आली आहे.

PATIL 5

ते निम्स युनिव्हर्सिटी, मुंबई येथून ‘सायबर क्राईम अँड डेटा प्रायव्हसी’ या विषयात पीएच.डी.करत आहेत. तसेच मेटा रिसर्च प्रोग्राममध्ये देखील ते फायनॅलिस्ट ठरले आहेत. ॲड.पाटील हे मनवेल आश्रम शाळेचे चेअरमन हुकूमचंद पाटील यांचे चिरंजीव असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now