गुन्हेजळगाव जिल्हाधरणगाव
विहिरीत पाय घसरून पडल्याने स्टँप वेंडरचा मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२२ । धरणगाव तालुक्यातील साळवा येथील रहिवासी व येथील स्टँप वेंडर मनोहर वसंत पाटील (वय ५०) यांचा शनिवारी दुपारी विहिरीत पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी येथील पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
स्टँप वेंडर मनोहर पाटील हे शनिवारी दुपारी ४ वाजेपूर्वी शेतात गेले होते. या वेळी अचानक पाय घसरून मनाेेहर पाटील हे विहिरीत पडले. या दुर्दैवी घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, सायंकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा साळवे येथे त्यांच्यावर शाेकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल करीम सय्यद करत आहेत.
हे देखील वाचा :