
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२२ । महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमा अंतर्गत जळगाव जिल्हयातील तक्रारींची जनसुनावणी मंगळवार दि. 08 फेब्रुवारी रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे सकाळी ११.०० वाजता होणार असून आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर या स्वतः तक्रारींची सुनावणी घेणार आहेत.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत प्रयत्न करत आहे.. महिलांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी “महिला आयोग आपल्या दारी” हा उपक्रम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. या जनसुनावणीवेळी पोलीस प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.
ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे. ‘महिला आयोग आपल्या दारी’ अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचं काम आयोगाद्वारे करत आहे.
जळगाव जिल्हयात होणाऱ्या जनसुनावणीत अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी यावेळी मांडाव्या, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात ‘रोजगार महाकुंभ’; उद्या २३ ठिकाणी मेळावे, 1250 हून अधिक नोकऱ्यांची संधी
- सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला
- जळगावात ‘होमिओपॅथी सायंटिफिक केस स्टडीज’ पुस्तकाचे प्रकाशन
- ‘इंडस्ट्रियल अॅप्रोच इन इलेक्ट्रॉनिक्स’ कार्यशाळा उत्साहात
- जळगावात मंदिरातील दानपेटी चोरीचा पर्दाफाश; संशयितासह बालक ताब्यात





