शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी खुशखबर.. सेबीच्या ‘या’ निर्णयाचा होणार असा फायदा
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी आहे. आता शेअर बाजारात गुंतवणूक करणे अधिक सोपे झाले आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी सारथी (Sa₹thi) हे मोबाईल अॅप लॉन्च केले आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना अनेक प्रकारची माहिती मिळेल. चला तर मग या अॅपबद्दल जाणून घेऊया.
सेबीने दिलेल्या माहितीनुसार, या अॅपवरून गुंतवणूकदारांना सिक्युरिटीज मार्केट, केवायसी (नो युवर कस्टमर) प्रक्रिया, ट्रेडिंग आणि सेटलमेंट, म्युच्युअल फंड, मार्केट याविषयी अपडेट मिळत राहतील. यामुळे त्यांना बाजारातील चढ-उतारांची माहिती राहील. यासोबतच गुंतवणूकदारांच्या तक्रारी निवारण यंत्रणेसारख्या गोष्टींची माहितीही उपलब्ध होणार आहे. म्हणजेच येत्या काळात हे अॅप गुंतवणूकदारांना मदत करेल.
तरुणांसाठी हे अॅप खूप खास
हे मोबाईल अॅप गुंतवणूकदारांना सिक्युरिटीज मार्केटबद्दलच्या ज्ञानाने सक्षम करण्याच्या उद्देशाने SEBI चा एक उपक्रम आहे. अलीकडेच अनेक गुंतवणूकदारांनी मार्केटमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे बहुतांश ट्रेडिंग मोबाईल फोनवर आधारित आहे, हे अॅप महत्त्वाची आणि वापरण्यायोग्य माहिती लोकांपर्यंत सहज उपलब्ध करून देण्यात मदत करेल. येत्या काळात हे अॅप गुंतवणूकदारांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय होईल.
हे अॅप दोन भाषांमध्ये उपलब्ध
हे अॅप हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ते तुमच्या Android किंवा iOS स्मार्टफोनवर वापरू शकता. म्हणजेच, तुम्ही ते प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअर दोन्हीवरून डाउनलोड करू शकता. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान हे अॅप लाँच करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष अजय त्यागी यांनी हे अॅप लॉन्च केले.
हे देखील वाचा :
- Gold Price : जळगावच्या सुवर्णबाजारात घसरणीनंतर सोन्याच्या भावात पुन्हा वाढ
- तूरचा भाव प्रति क्विंटल 5 हजारांनी घसरला; शेतकऱ्यांना मोठा फटका
- मध्यमवर्गीयांसाठी ‘या’ आहेत पाच परफेक्ट कार; किंमतही बजेटच्या बाहेर जाणार नाही!
- सर्वसामान्यांना झटका! जळगावात सोयाबीन तेलाचा भाव पुन्हा वाढला
- सर्वसामान्यांचा खिशा होणार आणखी खाली; पेट्रोल – डिझेलसह ‘या’ वस्तू महागणार, कारण काय?