⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

दिवाळीपूर्वी खाद्यतेलाच्या किमतीत पुन्हा वाढ, 15 दिवसात झाली ‘इतक्या’ रुपयांची वाढ

जळगाव लाईव्ह । १६ ऑक्टोबर २०२२ । गेल्या काही दिवसात खाद्यतेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. मात्र, आता ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या भावात वाढ झाली आहे. दिवाळी सणाला अवघे काही दिवस उरले आहे. त्यापूर्वी खाद्यतेल महागल्याने सर्वसामान्यांना झटका बसला आहे. गेल्या १५ दिवसात खाद्यतेलाच्या किमतीत जवळपास १० ते १३ रुपयाची वाढ झाली आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला स्थानिक बाजारात सोयाबीन तेलाच्या एका पाऊचची किंमत 120 ते 123 रुपयापर्यंत होते. तर खुले एक किलो तेलाचा दर जवळपास १२६ ते १३० रुपये इतके होते. परंतु दसऱ्यानंतर खाद्यतेलाच्या भावात वाढ दिसून आली. सध्या बाजारात सोयाबीन तेलाच्या एका पाऊचची किंमत १३० ते १३२ रुपयापर्यंत आहे. तर सुट्टे तेलाच्या एका किलोचा दर जवळपास १३० ते १३५ रुपयापर्यंत इतका आहे.

सप्टेंबर महिन्यात बाजारात सोयाबीन तेलाच्या एका पाऊचची किंमत 135 ते 135 रुपयापर्यंत इतकी होती. तर सुट्टे तेलाच्या एका किलोचा दर जवळपास 145 ते 148 रुपये तितकी आहे. मात्र काही झालेल्या घसरणीनंतर खाद्यतेलाच्या भावात जवळपास 20 रुपयाहुन अधिकची घसरण दिसून आली. मात्र आता एन सणासुदीत खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांना फटका बसला आहे.

मागील काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला होता. केंद्रीय प्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) खाद्यतेलाच्या किमती वाढण्याला आळा घालण्यासाठी आयातीवरील सीमाशुल्कात सवलत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशात सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचा वापर वाढतो. अशा परिस्थितीत या काळात तेलाच्या किमती वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले होते. परंतु त्यानंतरही खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहे.

भारतातील महागाई दर
सध्या भारतात चलनवाढीचा दर रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे. ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाईचा दर ७ टक्के होता. सप्टेंबर महिन्याची आकडेवारी येणे बाकी आहे. यापूर्वी जुलै महिन्यात किरकोळ महागाई दरात घट झाली होती आणि ती 6.71 टक्क्यांवर आली होती. सरकारने महागाई दर 2 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, परंतु सर्व प्रयत्न करूनही तो वरच राहिला आहे.