जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । पैसे देण्याचे आमिष दाखवून एका नराधमाने घराचा दरवाजा बंद करून 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार भडगाव तालुक्यात घडला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी विकास सिताराम पाटील याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकार?
भडगाव तालुक्यातील एका गावात राहणारी 6 वर्षीय बालिका आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ही चिमुकली खेळत असता गावातीलच संशयित नराधम विकास याने घरात बोलून, ‘मी पैसे देतो कुणाला काहीही सांगू नको’, असे म्हणून दरवाजा बंद करून तिच्यावर अत्याचार केला. सदर प्रकार दि ३ रोजी उघडकीस आला आहे.

यासंदर्भात पिडीत मुलीने नातेवाईकांना सांगितले. नातेवाइकांनी भडगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन पीडित मुलीचे आजोबा यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विकास सिताराम पाटील यांच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे करीत आहे.
दरम्यान, राज्यासह जिल्ह्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. तसेच अल्पवयीन मुली देखील सुरक्षित नसल्याने पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
हे देखील वाचा :
- गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणेशोत्सव स्पर्धांतून संस्कृतीचा जागर
- सराफा बाजारात शनिवारी मोठी तेजी! सोने-चांदीत तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ?
- जळगाव रेल्वे स्थानकावरील कामाचा फटका; १२ गाड्या रद्द, अनेकांच्या वेळेत बदल
- मुंबईत लालबागच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या तरुण अभियंत्याचा मृत्यू
- बांभोरी पुलावरून महिलेने घेतली गिरणा नदीत उडी; शोधमोहीम सुरू !










