जळगावात गळफास घेवून व्यवसायिकाची आत्महत्या

फेब्रुवारी 17, 2022 10:57 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२। जळगावात कापड व्यावसायिकाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. सुरेशकुमार मिठूमल मताना (वय ५०, रा. सिंधी कॉलनी) असे आत्महत्या केलेल्या कापड व्यावसायिकाचे नाव असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime jpg webp

शहरातील सिंधी कॉलनी राहणारे सुरेशकुमार मताना यांचे फुले मार्केट परिसरात कपडे विकून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. गुरूवारी ३ फेब्रुवारी रोजी रात्री कुटुंबियासोबत जेवण करून झोपले. मध्यरात्री त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीला आली. त्यांनी आत्महत्या का केली याबाबत माहिती मिळाली नाही.

नातेवाईकांनी मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. त्यांच्या पश्‍चात पत्नी कमला, मुलगा दीपक, सुन हीर, नात यशीका असा परिवार आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अच्छा यांनी दिलेल्या खबरीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास सचिन मुंढे हे करीत आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now