एटीएम पिन चोरून भामट्याने महिलेच्या खात्यातून लांबविला ७ लाखाचा ऐवज

फेब्रुवारी 17, 2022 10:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२ । सध्या फसवणुकीच्या घटना प्रचंढ वाढल्या आहे. अशातच एटीएम पिन चोरून भामट्याने महिलेच्या बँक खात्यातून तब्बल ७ लाख १९ हजार रुपये काढून घेतले. नयन आननसिंग गढरी (वय १९ रा. पिंपरखेड ता. भडगाव) असे फसवणूक आलेल्या महिलेचे नाव असून याप्रकरणी भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

currency

याबाबत असे की, नयन आननसिंग गढरी (वय १९ रा. पिंपरखेड ता. भडगाव) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, २४ ते ३१ जानेवारी दरम्यान अज्ञात चोरट्याने त्याची आई कविता गढरी यांच्या खात्यातून पैसे काढून घेतले. गढरी यांचे पिंपरखेड येथील बँक ऑफ बडोदा शाखेत खाते आहे. काही दिवसांपूर्वी नयन गढरी (वय १९) हा आईसोबत पिंपरखेडहून भडगाव येत होता. त्यावेळी त्यांची दुचाकी घसरली होती.

अपघातात कविता गढरी यांना किरकोळ मार लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी नयनने आईच्या एटीएमद्वारे बसस्थानकासमोरील अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून पैसे काढले होते. त्यावेळी पैसे निघत नसल्याने त्याला अनोळखी व्यक्तीने मदत केली होती. त्याच अनोळखी संशयिताने पैशांवर डल्ला मारला असावा, असा संशय आहे. मंगळवारी गढरी हे पिंपरखेड येथील बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्या असता, त्यांच्या खात्यात पैसेच नसल्याचे समोर आले.

भडगाव येथे बसस्थानकासमोर अनेक बँकांचे एटीएम आहेत. त्यापैकी कुठेही सुरक्षा रक्षक नसल्याने एकावेळी एकापेक्षा अनेक व्यक्ती एटीएममध्ये शिरतात. त्यातून एटीएमचा पिन चोरणे, एटीएम कार्ड बदलून फसवणूक करण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे बँकांनी एटीएमच्या सुरक्षेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now