भुसावळ

विनयभंगाच्या मनस्तापातून अल्पवयीन मुलीने घेतला गळफास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२ । भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय येथे विनयभंगातून झालेला मनस्ताप सहन न झाल्याने १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना गुरुवारी समोर आली आहे. याप्रकरणी एका संशयिताविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी काय आहे घटना?
बेलव्हाय येथील युवराज उर्फ गोलू रवींद्र नेहेते (वय २३) हा मंगळवारी (दि.१) लैंगिक गैरवर्तन करण्याच्या उद्देशाने पीडित मुलीच्या घरी गेला. तेथे मुलीला आमिष दाखवून तिचा विनयभंग केला. या प्रकारानंतर अल्पवयीन पीडित मुलीने मनस्ताप करून घेऊन राहत्या घरात छताच्या कडीला ओढणीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.

गुन्हा दाखल

दरम्यान, या घटनेबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात युवराज उर्फ गोलू रविंद्र नेहते याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह भादवि कलम ३०५, ३०६, ३५४ (अ), (१), ४५२ यासह पोस्को ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार हे करत आहेत.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button