जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । चाळीसगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राष्ट्रीय ज्युनियर कॉलेज च्या परिसरात रोडरोमिओंचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या कॉलेजच्या परिसरात ज्युनियर कॉलेजच्या वेळेमध्ये रोडरोमियो जास्त प्रमाणात सक्रिय असतात. अकरावी बारावीतील तरूणींचा पाठलाग करणे, कॉलेज तरुणींच्या मागे काही उद्देशाने गाडी घेऊन फिरणे, तासन तास कॉलेजच्या आतील व बाहेरील परिसरामध्ये उभे राहणे, विनाकारण टाईमपास करणे. इत्यादी प्रकार राष्ट्रीय कॉलेजच्या परिसरामध्ये सुरू आहे.
चाळीसगाव पोलिस स्टेशन तर्फे निर्भया पथक तयार करण्यात आले आहे. काही सामाजिक महिला संघटनांनी देखील यापूर्वी पोलीस निरीक्षकांना निवेदन वगैरे दिलेली आहे. पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी सुद्धा रोडरोमिओंवर सक्त कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. मात्र सध्या पोलिस प्रशासनाचे कॉलेज परिसरांमध्ये लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. पोलीस प्रशासनाने व निर्भया पथकांनी पुन्हा सक्रिय होऊन या रोडरोमिओंचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी चाळीसगावातील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. कॉलेजचे प्राचार्य आणि प्राध्यापक यांनी सुद्धा ऑफिसच्या बाहेर येऊन कॉलेज परिसरामध्ये देखील लक्ष देण्याची गरज आहे.पालकांनी देखील कॉलेजला गेलेल्या आपल्या मुला-मुलींवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.
हे देखील वाचा :
- साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू
- राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत ‘भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन
- मुक्ताईनगरमध्ये लागणार धक्कादायक निकाल; संभाव्य आमदार कोण? पाहा..
- चाळीसगाव मतदारसंघात कोणता आमदार निवडून येणार? पाहा exit Poll
- महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार? वाचा सट्टा बाजाराचा अंदाज?..