चोरीला गेलेला माल परत मिळवून द्या, व्यापाऱ्यांची मागणी
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२२ । शहरातील व्यापारी यांचा रेडीमेड कपड्यांचा माल -साईनाथ ट्रान्सपोर्टचे मालक साईनाथ साहेबराव काळे यांचे ट्रान्सपोर्ट गाडीतून चोरी झाल्याबद्दल जळगाव होलसेल रेडीमेड, होजअरी व कपडा असोसिएशन व्यापारी यांनी जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आमचा रेडिमेट कपड्यांचा व्यवसाय असून आम्ही साईनाथ ट्रान्सपोर्ट ‘यांच्याकडे ३१ जानेवारी २०२२ रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान त्यांच्या ताब्यात दिला होता. सदर उमाळा, जाफराबाद, भोकरदन, फुलंबी, सिल्लोड येथे व्यापाऱ्यांकडे जाणार होता. मालातून ५२ ते ६० पार्सल पोलीस रेल्वे स्टेशनच्या हद्दीमध्ये चोरी करण्यात आले असून बाकी उर्वरित मालगाडीमध्ये जमा असल्याची फिर्याद ट्रान्सपोर्टचे मालक साईनाथ काळे यांनी दिनांक १ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता दिली.
चोरीला गेलेला माल व आरोपी लवकर शोधून सदर माल संबंधित व्यापारी बांधवांना मिळवून द्यावा आणि आरोपीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जळगाव होलसेल रेडीमेड, होजअरी व कपड़ा असोसिएशन व्यापाऱ्यांच्या वतीने चंद्रकांत गवळी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे देखील वाचा :
- Pachora : वाळू माफियांकडून महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, चौघांना अटक
- जळगावमध्ये तापमानात मोठी वाढ, थंडीही ओसरली; आता पुढे कसं राहणार हवामान? वाचा..
- Gold Price : जळगावच्या सुवर्णबाजारात घसरणीनंतर सोन्याच्या भावात पुन्हा वाढ
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !