‘त्या’ जखमी तरुणाची मृत्यूशी झुंज अखेर संपली

फेब्रुवारी 17, 2022 10:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून पोटात चाकू भोसकून जखमी केलेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज अखेर संपली. उपचारादरम्यान, त्या तरुणाचा आज मृत्यू झाला आहे. अतुल विजय कोळी (नन्नवरे) (वय-२५) असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

crime jpg webp

नेमक काय आहे प्रकरण?

धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील नितीन साहेबराव बाविस्कर याच्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून जुन्या वादाची किनार यातून धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील अतुल विजय कोळी (नन्नवरे) (वय-२५) या तरूणावर गावातील अजय विनोद नन्नवरे रा. बांभोरी ता. धरणगाव याने पोटात चाकू भोसकून गंभीर रित्या जखमी केल्याची घटना २७ जानेवारी रोजी मध्यरात्री घडली होती.

जखमी झालेल्या अतुल नन्नवरे याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी संशयित आरोपी अजय विनोद नन्नवरे, विजय विनोद नन्नवरे, संदीप घमा नन्नवरे आणि ज्ञानेश्वर भावलाल नन्नवरे सर्व रा. बांभोरी ता. धरणगाव यांना अटक केली होती. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, जखमी अतुल नन्नवरे हा जळगाव जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार घेत असतांना बुधवारी २ फेब्रुवारी रोजी सकाळी ३ वाजता मृत्यू झाला आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आाला आहे. मयतच्या पश्चात आई अन्नपुर्णाबाई, वडील विजय बाबुराव नन्नवरे आणि मोठा भाऊ राहूल नन्नवरे असा परिवार आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now