जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । धावत्या रेल्वेतून पडून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी दुपारी शिरसोली येथील रेल्वे स्थानकाजवळ घडलीय. तालुका पोलीसांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, गोवा एक्सप्रेसमधून पडल्याने अनोळखी ३५ ते ४० वर्षीय अनोळखी व्यक्ती जागीच ठार झाला आहे. जळगाव पाचोरा दरम्यान शिरसोली रेल्वे स्टेशन जवळ खांबा क्रमांक ४०९/२४ ते २६ दरम्यान मृतदेह आढळून आला होता. याबाबत स्टेशन प्रबंधक योगेश खांबे यांनी शिरसोली येथील पोलीस पाटील श्रीकृष्ण पाटील यांना खबर दिली. त्यानुसार पोलीस पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी विश्वनाथ गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

तालुका पोलीसांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ विश्वनाथ गायकवाड करीत आहे.
हे देखील वाचा :
- गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणेशोत्सव स्पर्धांतून संस्कृतीचा जागर
- सराफा बाजारात शनिवारी मोठी तेजी! सोने-चांदीत तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ?
- जळगाव रेल्वे स्थानकावरील कामाचा फटका; १२ गाड्या रद्द, अनेकांच्या वेळेत बदल
- मुंबईत लालबागच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या तरुण अभियंत्याचा मृत्यू
- बांभोरी पुलावरून महिलेने घेतली गिरणा नदीत उडी; शोधमोहीम सुरू !










