जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । महिला सक्षमीकरण व उद्योजकता विकास समिती आणि खामगाव येथील गो.से. विज्ञान कला व वाणिज्य महाविद्याल यांच्या संयुक्त माध्यमाने आयोजित राज्यस्तरीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धेतील खुल्या गटात शेंदुर्णी येथील डॉ. योगिता पांडुरंग चौधरी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

जागर स्त्री-पुरुष समानतेचा या उपक्रमाच्या अंतर्गत ३ ते १२ जानेवारी-दरम्यान राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात “एकविसाव्या शतकातील जिजाऊ शिक्षिका मी’ या कवितेतून मांडत डॉ. योगिता चौधरी यांनी परीक्षकांची मते जिंकली. पारितोषिकाच्या स्वरूपात रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र त्यांना प्राप्त होणार आहे. याआधीही राज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत त्यांनी दोन वेळा पारितोषिक प्राप्त केले आहे.

हे देखील वाचा :
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






