जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । फांद्या तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या शेतकऱ्याचा झाडावरुन तोल जाऊन खाली पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी जामनेर तालुक्यातील शेरी येथे घडली. युवराज शंकर पांढरे(वय ५४) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून याबाबत पहूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

युवराज पांढरे हे सोमवारी दुपारी नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. बांधावरील झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी ते झाडावर चढले होते. अचानक त्यांचा तोल जाऊन ते खाली कोसळले. यावेळी इतर शेतकऱ्यांना ही घटना लक्षात येताच त्यांनी धाव घेत युवराज पांढरे यांना पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

यावेळी शेरी येथील नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. संजय पांढरे यांच्या माहितीवरून पहूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद झाली. मृत पांढरे यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.
हे देखील वाचा :
- गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणेशोत्सव स्पर्धांतून संस्कृतीचा जागर
- सराफा बाजारात शनिवारी मोठी तेजी! सोने-चांदीत तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ?
- जळगाव रेल्वे स्थानकावरील कामाचा फटका; १२ गाड्या रद्द, अनेकांच्या वेळेत बदल
- मुंबईत लालबागच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या तरुण अभियंत्याचा मृत्यू
- बांभोरी पुलावरून महिलेने घेतली गिरणा नदीत उडी; शोधमोहीम सुरू !










