जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जानेवारी २०२२ । शहरातील जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सोमवार दि.३१ जानेवारी रोजी सायंकाळी सहाय्यक अधिक्षकांच्या पथकाने छापा टाकल्यावर प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात माहिती अशी की, जळगाव-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या अमरनाथ हॉटेलमध्ये बेकायदेशीररित्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राहुल रगडे, आशा पांचाळ, सुनिल पाटील, किरण धमके, चंद्रकांत चिकटे, संतोष जाधव, रविंद्र सुरळकर, रविंद्र कारंकाळ, मिलींद पाटील यांनी सोमवारी ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अमरनाथ हॉटेलमध्ये छापा टाकला. या कारवाईत राजेश मिठाराम ठोंबरे (वय-४९) रा.जुना खेडी रोड, जळगाव, विकास रमेश सोनवणे (वय-२७) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हे वेगवेगळ्या खोलीत दोन महिलांसोबत आढळून आले.

पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी यांच्या फिर्यादीवरून हॉटेल मालक शंकर दुलाराम महाजन वय ४१ रा.हनुमान नगर, जळगाव, ग्राहक राजेश मिठाराम ठोंबरे आणि विकास रमेश सोनवणे यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे करीत आहे.
हेही वाचा :
- Jalgaon : बस स्थानकांवर चोऱ्या करणारा सराईत अटकेत ! 3 गुन्हे उघड, लाखोंचे दागिने हस्तगत
- घर बंद करून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला! ३.२२ लाखांचा मुद्देमाल लंपास
- मुक्ताईनगरात भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी
- गणेशोत्सवाच्या धामधुमीत जळगाव हादरले; आईसह ५ वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
- Parola : दागिन्यांच्या लालसेतून मावशीचा खून; ४० दिवसांनंतर हत्येचा उलगडा, भाच्याला अटक







