जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जानेवारी २०२२ । जामनेर तालुक्यातील एका गावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमसंबंध प्रस्थापित करुन तसेच लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार झालेली अल्पवयीन मुलगी गर्भवती होवून तिची प्रसूती झाली आहे. यात जन्मलेल्या सात महिन्यांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. तिचे मयुर रमेश कोळी या तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. यादरम्यान तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवित सुरत येथे पळवून नेले होते. तसेच तिच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणी अपहरणासह अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात संशयित मयुर यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली.

जामीनावर सुटका झाल्यानंतर मयुर याने पुन्हा अल्पवयीन मुलीशी शारिरीक संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केला. याच दरम्यान मुलीचा पाय भाजला गेल्याने पायावर उपचार सुरु असतांना मुलगी ही गर्भवती असल्याचे समोर येवून तीची प्रसूती झाली. बाळ कमी दिवसाचे असल्याचे समोर आले होते. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जन्मलेल्या या बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन अत्याचार करणाऱ्या संशयित मयुर कोळी याच्याविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
हे देखील वाचा :
- यावल-सावखेडा मार्गावर धोकादायक फांद्या छाटा व फलक लावा; ॲड. देवकांत पाटलांची PWD कडे मागणी
- जळगाव जिल्ह्यावासीयांसाठी खुशखबर! गिरणा धरणाची जलपातळी ८६ टक्क्यांवर पोहोचली!
- यावल आयटीआयमध्ये विविध पदांसाठी भरती; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न
- महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी












