देवदर्शनापूर्वीच पहाटे महिलेवर काळाची झडप, ट्रकच्या धडकेत मृत्यू

जानेवारी 31, 2022 1:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जानेवारी २०२२ । सकाळी सकाळी उठून मंदिरात दर्शनासाठी पायी जात असलेल्या महिलेवर काळाने झडप घातली. महिलेस ट्रकने मागून धडक दिल्‍याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भुसावळ शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ घडली. मीनाबाई मोहन अग्रवाल (वय ५५) असे मयत महिलेचे नाव असून अपघाती निधनामुळे (Accident Death) परिसरावर शोककळा पसरली आहे.

accident jpg webp

काय आहे घटना?

मीनाबाई अग्रवाल या तु.स. झोपे शाळेजवळ, मेथाजी मळा येथील रहिवाशी आहेत. त्या सकाळी सकाळी मंदिरात दर्शनासाठी जात असतांना त्यांना शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाजवळ ट्रकने जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या मंदिरात दर्शनासाठी जात असतांना काळाने त्यांच्यावर झडप घातली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. मयत महिला ही तु.स. झोपे शाळेजवळ, मेथाजी मळा येथील रहिवासी असून त्यांच्या अपघाती निधनामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now