माळी समाज वधू-वर व पालक परिचय पुस्तिका विमोचन सोहळा संपन्न

फेब्रुवारी 17, 2022 10:57 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२२ । श्री.संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठान व समस्त माळी समाज पंचमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वधू-वर व पालक परिचय पुस्तिका 2020 चे विमोचन आज रोजी सिग्मा सेवन कॉम्प्युटर्स, पहिला मजला, शाहु कॉम्पलेक्स, जळगांव येथे करण्यात आले. श्री संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठानचे यंदाचे दहावे वर्ष आहे.

mali samaj jpg webp

कोरोनाच्या पार्श्‍वभुंमीवर मर्यादीत समाजबांधवांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. या पुस्तिकेत जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरील उप वर-वधुचा समावेश असुन पुस्तीका विमोचन प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय महाजन, उपाध्यक्ष जयंत इंगळे, प्रतिष्ठानचे सचिव व खान्देश दर्शनचे संपादक शरद मोरे (माळी), खजिनदार विवेक महाजन, संचालक व कार्यकारिणी प्रकाश साबळे, गोपाळ चौधरी, सोमनाथ महाजन, डी.बी.महाजन, वामन महाजन, वसंत बिरारी, दिलीप माळी तसेच समाजसबांधव उपस्थित होते.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now