कासोद्याचा अक्षय शिंपी राजपथवरील परेडमध्ये झळकला
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२२ । कासोदा नौदलात भरती झालेल्या कासाेदा येथील अक्षय प्रवीण शिंपी याने सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्ली येथील राजपथावर पार पडलेल्या नौदल तुकडीच्या परेडमध्ये सहभाग घेतला होता. नाैदलाच्या १४४ जवानांमधून अक्षय शिंपी याची निवड झाली हाेती.
अक्षय हा दहावीत प्रथम क्रमांकाने तर बारावीत विज्ञान शाखेतून तालुक्यात द्वितीय क्रमांकाने पास झाला हाेता. त्यानंतर नाैदलाच्या परीक्षेत अक्षय पास झाल्याने त्यास वैद्यकीय चाचणीसाठी ओरिसा राज्यातील इंडियन नेव्ही शिप आयएनएस चिलका येथे बोलावले. तेथेच त्याला प्रशिक्षण देण्यात आले. सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर २ हजार ५०० प्रशिक्षणार्थी जवानांमधून १४४ जवानांची निवड झाली हाेती. त्यातही काेविडच्या पार्श्वभूमिवर केवळ ९९ जवानांची निवड करण्यात आली. त्यात कासोदा येथील अक्षयची वर्णी लागली. अक्षयचे वडील चालक आहेत तर आई शिवणकाम करते.
हे देखील वाचा :
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन
- जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाह्य साठा नष्ट ; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
- जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात
- ग्राहकांना दिलासा ! मकर संक्रांतीनंतर जळगावच्या सुवर्णपेठेत सोने-चांदीचा भाव घसरला..