जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२२ । शहरात चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. विद्यानगर, शिवाजी उद्यान परिसरातुन चोरट्यांनी दोन दुचाकी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिली चोरी : विद्यानगरात घरासमोर लावलेली पाच हजार रुपये किमतीची दुचाकी २३ जानेवारी रोजी चोरट्याने लांबवली. दीपक वासुदेव फालक (वय ३५) यांच्या मालकीची ही दुचाकी (एमएच १९ एजे ११०१) आहे. याप्रकरणी फालक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील पाटील तपास करीत आहेत.

दुसरी चोरी : मेहरूण तलाव परिसरातील शिवाजी उद्यानातून ३० हजार रुपयांची दुचाकी २२ जानेवारी रोजी दुपारी चोरीस गेली. सलीम शब्बीर शेख (वय ३१, रा. तांबापुरा) यांच्या मालकीची ही दुचाकी (क्रमांक एमएच-१९, सीएल-३४३२) आहे. याप्रकरणी शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात चाेरीच्या घटनामध्ये वाढ झाली असून नागरिक हैराण झाले आहेत.
हे देखील वाचा :
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त






