⁠ 
सोमवार, मे 6, 2024

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात भारतीय संस्कृतीचा अविष्कार

समन्वय २०२४ स्नेहसमेलनाचा आर्टगॅलरी कलागंणातून आज प्रारंभ

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२४ । भारतीय संस्कृती विविधतेने सजली असून भावी वैद्यकिय तज्ञांनी हा संस्कृतीचा अविष्कार डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात समन्वय २४ स्नेहसंमेलनातून अवतरणार असून आज प्रारंभ आर्टगॅलरी कलांगणातून करण्यात येणार आहे. पुढील सात दिवसात विविध स्पर्धा व कार्यक्रमांची मेजवानी समन्वयमधून बघायला मिळणार आहे.

भावी वैद्यकिय तज्ञांचा कलाविष्कार अर्थात कलांगणचा प्रारंभ डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ.प्रशांत सोळंके, वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. चंद्रया कांते, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, यांच्या हस्ते फित कापून करण्यात येईल.

यावेळी विविध विभागाचे प्रमुख डॉक्टर, कर्मचारी वर्ग उपस्थीत राहणार आहे. हे प्रदर्शन शनिवार दि.१५ एप्रिल पर्यंत खुले ठेवण्यात आले आहे. समन्वय स्नेहसंमेलनात गुरूवार दि २५ एप्रिल रोजी आर्टगॅलरी, २६ रोजी प्रोम नाईट, होम बॅण्ड. दि २७ रोजी टीचर आणि जे आर नाईट,२८ रोजी व्टीनिंग डि.जे नाईट आणि फनफेअर, बुधवार दि.२९ रोजी कॉन्सर्ट आणि दि ३० रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. समन्वयचे आयोजक शौर्य २०२१ बॅचची टीम परिश्रम घेणार आहे.