जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२२ । नंदूरबार रेल्वे स्थानकावर पुरी गांधीधाम एक्सप्रेसला भीषण आग लागली. आगिचे कारण अद्याप समजू शकले नसून या भीषण आग लागल्याने प्रवाशी प्रचंड हादरून गेले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

याबाबत असं की, आज सकाळी गांधीधाम पुरी एक्सप्रेस नंदूरबार स्थानकात येत असताना अचानक एक्सप्रेसच्या पॅन्ट्रीच्या डब्याला आग लागली. पॅन्ट्रीच्या डब्यात जेवण साहित्य, गॅस सिलिंडर आणि इतर साहित्य असते. त्या ठिकाणीच आगीने पेट घेतला. बघता बघता ही आग दुसऱ्या डब्यापर्यंत जाऊन पोहोचली. आगीने रौद्ररुप धारण केले. आगीबरोबर धुराचे लोळही पसरल्याने प्रवाशी हादरून गेले.

जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची एक्सप्रेसमध्ये एकच धावपळ उडाली. काही प्रवाशांनी तर घाबरून आरडाओरड सुरू केली. किंचाळ्या आणि गोंगाटामुळे एक्सप्रेसमध्ये एकच गोंधळ उडाला. स्टेशन जवळ आल्याने एक्सप्रेसचा स्पीड कमी होता. त्यामुळे मोटरमनने प्रसंगावधान राखून एक्सप्रेस थांबवली. अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास सुरुवात केली आहे.
हे देखील वाचा :
- कर्जमाफी योजनेतून जळगाव जिल्ह्यातील तब्बल ‘इतके’ हजार शेतकरी अपात्र?
- प्रवाशांना दिलासा ! जळगाव-भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ
- समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय; पालकमंत्री गुलाबराव पाटील
- कर्जबाजारीपणा अन् नैराश्यातून अमळनेरातील तरुण शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त जळगाव पोलिसांची पत्रकारांसाठी छायाचित्र स्पर्धा











