अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

फेब्रुवारी 17, 2022 10:58 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२२ । अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवणाऱ्या आरोपीविरुद्ध फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या गुन्ह्यातील आरोपीला गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ताब्यात घेतले.

crime 4 1 jpg webp

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याबाबत फैजपूर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गु.र.नं. ०७/२०२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलीने घरी फोन लावण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने फोन लावू दिला नाही. याउलट आरोपीने अल्पवयीन मुलीस घरात डांबून ठेवले होते. आरोपी बाहेर जाताना घराला कुलूप लावून जात असे. सुभान सिताबखा तडवी असे आराेपीचे नाव असून ताे इस्लामपूर, ता.जळगाव जामोद, जि.बुलढाणा येथील रहिवासी आहे.

पुढील तपास फैजपूरचे सपाेनि सिद्धार्थ आखेगावकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मसलोद्दीन शेख, पो.ना.उमेश चौधरी, किरण चाटे करत आहे. पाेलिस पथकाने हैदराबाद येथून आरोपीसह अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले. मुलीला तिच्या वडिलांच्या ताब्यात दिले.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now