जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । इंडिगो एअरलाइन्स डेमोस्टिक कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून २६ वर्षीय तरुणीची ३१ हजार रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून २५ रोजी तालुका पोलीसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखलझाला आहे.
तालुका पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनाक्षी विश्वासराव इंगळे (वय-२६) रा. वाघ नगर सावखेडा शिवार, जळगाव ही तरुणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ८ जुलै २०२१ रोजी त्यांचा नंबरवर एका अनोळखी नंबरने मेसेज टाकून इंडिगो एअरलाइन्स डेमोस्टीक येथे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. यासाठी त्यांनी १३ जुलै रोजी १३ हजार रूपये ऑनलाईन पध्दतीने पैसे ट्रान्सफर केले. पैसे भरून नोकरी मिळाली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे समजले. तरुणीने मंगळवारी २५ जानेवारी रोजी रात्री १२ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तरुणीच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात संशयित आरोपी बैंक अकाउंट धारक सनोज कुमार, अवंतिका ठाकूर, सिमरन आणि प्रीती (पुर्ण नाव माहित नाही) यांच्यासह एक जण असे एकूण ५ जणांविरोधात पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे करीत आहे.
हे देखील वाचा :
- पहूर परिसरात अपघाताची मालिका सुरूच; महिंद्रा पिकअप पलटी होऊन १४ जण जखमी
- भुसावळच्या प्रौढास चाकूचा धाक दाखवून लुटणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात
- भुसावळच्या व्यापाऱ्याला सायबर ठगांनी लावला ३४ लाखाचा चुन; अशी झाली फसवणूक?
- जळगाव जिल्ह्यातील ‘या’ शहरात आढळल्या शंबरच्या बनावट नोटा; दोघे पोलिसांच्या ताब्यात
- जळगावात अवैध गॅस भरणा केंद्रावर पोलिसांचा छापा; ३४ गॅस सिलेंडर जप्त