जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । बोदवड नगरपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवावरून भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली होती. महाजन यांच्या टीकेला आता खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बोदवड नगरपंचायत (Bodwad Nagar Panchayat) निवडणुकीत आम्ही आधीच पराजय स्वीकारला. भाजपाची इतकी वाईट परिस्थिती जिल्ह्यात कधीही नव्हती. भाजपला दुसऱ्याचा सहारा घेऊन एकनाथ खडसे यांचा पराभव करण्यासाठी लढावे लागते ही चिंताजनक बाब असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले.
तसेच जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन यांनी छुप्या युतीमुळे भाजपा विकून टाकली असल्याची टीकाही खडसे यांनी केली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून छुपी युती होती त्यामुळं रोहिणी खडसे यांचा पराभव झाला, असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. मी भाजपमध्ये असताना एकट्याने जिल्ह्यात भाजप उभी केली. भाजप एकट्याच्या बळावर लढत होती. आता गिरीश महाजन दुसऱ्याची मदत घेवून भाजपला धुळीत घालत आहेत, अशी टीका खडसे यांनी केली.
काय म्हणाले होते ?
बोदवड नगरपंचायतीबाबतीत एकनाथ खडसे यांना काही म्हणायचे ते म्हणू द्या. विधानसभेत एकनाथ खडसे पडले खरं तर ते मुख्यमंत्री यांच्या शर्यतीत होते. बोदवड मध्ये ते हरले आता कारण कशाला सांगत आहात. मोठ्या मनाने सांगाना आम्ही हरलो ज्याच्यात दम आहे तो निवडून येतो. मुक्ताईनगरमध्ये त्यांचे सरकार नाही, त्यांच्या गावात त्यांचे सरकार नाही. काही कारणं सांगायची आणि आपली पुंगी वाजायची, असा प्रकार खडसे यांचा सुरू असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.
हे देखील वाचा :
- साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत ‘भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन
- मुक्ताईनगरमध्ये लागणार धक्कादायक निकाल; संभाव्य आमदार कोण? पाहा..
- उमेदवारांनो मुंबई गाठा! निकलाआधी शरद पवारांच्या महत्त्वाच्या सूचना, वाचा काय आहेत?