विविध महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२२ । गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात राष्ट्रीय मतदान दिन साजरा करण्यात आला. त्यात १८ वर्षावरील नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी, बाबत मार्गदशन करण्यात आले. कार्यक्रमात प्राचार्य मौसमी लेंढे, उपप्राचार्य मेनका, एस.पी. यांच्यासह, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक होते.
याप्रसंगी उपस्थीतांनी आपआपले निवडणूक कार्य हातात घेऊन शपथ घेतली. सभागृहातील सहभागींनी मास्कसह सोशल डिस्टन्स राखू कोविड नियमांचे पालन करण्यात आले.
डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीने राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात निवडणुक साक्षरता मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, उपप्राचार्य प्रा.पी एस देवरे, शिक्षण प्रभारी एस.एन पाटील, साक्षरता निवडणूक मंडळाचे नोडल अधिकारी तसेच विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.आर.डी चौधरी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. एस. राणे, व सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरिराज कणखरे तर आभार प्रदर्शन पवन काळे या विद्यार्थ्यांनी केले.
डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीने राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
नवमतदारांमध्ये जागृती तसेच निवडणूक प्रक्रियेसह मतदार नोंदणी कार्यक्रमाची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात निवडणुक साक्षरता मंडळ स्थापन करण्यात आलेले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.पी. आर. सपकाळे तसेच नोडल अधिकारी डॉ. ललीत जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक साक्षरता मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम प्रवेशित विद्यार्थी, राष्ट्रीय स्वयंसेवक तसेच कार्यक्रमास उपस्थीत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांकडून शपथ घेण्यात आली . तसेच महाविद्यालयातील सहाव्या व आठव्या सत्राचे विद्यार्थी शुभम म्हस्के, सागर पोखरकर, कृतिका हरणे, अभिजीत गव्हाणे यांनी मतदार नोंदणी करावयाची माहिती, मतदानाचे महत्त्व अशा वेगवेगळ्या विषयावर प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थांना माहिती देण्यात आली. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- गोदावरी अभियांत्रिकीत आज स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन
- जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाह्य साठा नष्ट ; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
- जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात
- ग्राहकांना दिलासा ! मकर संक्रांतीनंतर जळगावच्या सुवर्णपेठेत सोने-चांदीचा भाव घसरला..
- खेळामध्ये सांघिक भावना असणे खूप महत्वाचे : आ. राजूमामा भोळे