जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२१ । राज्यात महिला आणि मुलींवर अत्याचार होण्याचे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. जळगाव जिल्ह्यात देखील अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येतेय. अशातच मेहुण्यासह इतर तिन जणांनी अत्याचार करून गर्भवती केलेल्या ३७ वर्षीय अपंग महिलेने आत्महत्या केली. ही घटना चोपडा तालुक्यात घडली असून याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत महिला तालुक्यातील एका गावात भावासह वास्तव्याला होती. महिला ही अपंग असल्याने ही भावाकडे राहते. दरम्यान तिचे मेहुण्यासह इतर तिन जणांनी अपंग पणाचा फायदा घेत पीडीत महिलेवर वारंवार अत्याचार केला.

या अत्याचारातून महिला ६ महिन्याची गर्भवती राहिली. हा त्रास सहन न झाल्याने पीडीत महिलेने २४ जानेवारी रोजी सकाळी आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी पीडीत मुलीच्या भावाच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किरण दांडगे करीत आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात एफडीएची धडक कारवाई ! ५ हॉटेलचे परवाने निलंबित, ३८ लाखांचा गुटखा जप्त
- जळगाव शहर पोलिसांची चोरीच्या गुन्ह्याचा छडा; तीन आरोपी अटकेत, १० हजारांची रोकड जप्त
- मुक्ताईनगरातील ट्रॅव्हल्समधील डिझेल चोरीचा उलगडा, भिवंडीतील दोन आरोपी जेरबंद
- चाळीसगाव लैंगिक अत्याचार प्रकरण; आरोपीला 20 वर्षांचा सश्रम कारावास
- चोपडा हादरले! जन्मदात्या बापाचा दोन मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर










