जळगाव लाईव्ह न्यूज । विनोद कदम । अमळनेरात शहरात विविध संस्था, व लोकप्रतिनधींना नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीच्या विसर पडल्याचे चित्र दिसून आले. मात्र, “जेथे कमी तेथे आम्ही” या ग्रुपच्या सदस्यांतर्फे सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करण्यात आले.
स्वातंत्र्य मिळवुन देण्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे थोर स्वातंत्र्य सैनाणी यांच्या अमळनेर शहरातील मध्यवर्ती व रहदारीच्या सुभाष चौकातील पुतळा हा दुर्लक्षित असल्याचे लक्षात येताच व तेथील संरक्षक कठडे आणि मोकाट जनावरांचा विळखा बघून शहरातील “जेथे कमी तेथे आम्ही” या ग्रुपच्या सदस्यांनी तात्काळ सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची साफसफाई करून नेताजींच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले. तसेच अमर रहे अमर रहे नेताजी अमर रहे या जयघोषाने चौक दुमदुमून गेला. यावेळी थोर स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला व “तुम मुझे खून दो ! मैं तुम्हे आजादी दूंगा ! या त्यांच्या घोषनेने इतिहासातील ज्वलंत प्रसंगांना उजाळा मिळाला.
यावेळी ग्रुपचे सदस्य माजी सैनिक राजेंद्र यादव, पत्रकार सचिन चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सौरव सोनवणे, गोटू रणदिवे, स्वप्निल जाधव, भीमराव पवार, विनोद देसाई, योगेश मिस्तरी विक्की व महाजन आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- जळगावात अवैध गॅस भरणा केंद्रावर पोलिसांचा छापा; ३४ गॅस सिलेंडर जप्त
- गोदावरी नर्सिंगच्या एएनएम द्वितीय वर्षाचा उत्कृष्ट निकाल
- सहा.संचालक डॉ विवेकानंद गिरी यांची डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयास भेट
- जळगाव जिल्ह्यात अजय-अतुलचा लाईव्ह कार्यक्रम; कुठे आणि कधी होणार?
- कांद्याच्या भावात मोठी घसरण; आता प्रतिक्विंटलला मिळतोय ‘इतका’ भाव?